लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी पेंढार : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी रामदास पवार यांची तर उपसरपंचपदी संजय खेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व नवनियुक्त ११ सदस्य उपस्थित होते. यामध्ये रामदास पवार, संजय खेडकर, सचिन निलख, जिजाभाऊ भोर, पंढरीनाथ पाचपुते, सुवर्णा मुटके, संगिता भोर, उल्का पाचपुते, शाहिदा पठाण, शुभांगी निलख, सुजाता लांडगे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. आर. मैड यांनी काम पहिले. सरपंच पदासाठी रामदास विश्वनाथ पवार यांचा एकमेव अर्ज आला तर उपसरपंच पदासाठी संजय विठ्ठल खेडकर यांचाही एकमेव अर्ज आल्याने दोन्ही निवडी या बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी बी. एम. वाघे यांनी काम पाहिले.
वडगाव कांदळी ग्रामपंचायत निवडणूक २०२१ते २०२५ या कालावधीसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वडगाव कांदळी महाविकास आघाडीने आठ जागा जिंकल्या होत्या. महाविकास आघाडी पॅनेलचे नेतृत्व श्रीकांत पाचपुते, रामदास पवार, संजय खेडकर यांनी केले तर सचिन निलख यांच्या नेतृत्वाखाली बिरोबा महाराज ग्रामविकास पॅनलला तीन जागा मिळाल्या होत्या. वडगाव कांदळी ग्रामपंचायत निवडणूक जरी दोन पॅनेलमध्ये लढली गेली असली तरी गावच्या विकासासाठी आम्ही सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली यामध्ये कुठलेही राजकारण केले नाही अशी प्रतिक्रिया बिरोबा महाराज ग्रामविकास पॅनलचे प्रमुख सचिन निलख यांनी दिली.
फोटो- वडगाव कांदळी ता. जुन्नर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी रामदास पवार यांची तर उपसरपंचपदी संजय खेडकर यांची बिनविरोध