जेजुरी: पुरंदर तालुक्यातील साकुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रमेशनाना सदाशिव जाधव यांची, तर उपसरपंचपदी प्रमिला संतोष जगताप यांनी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी गोपाळ लाखे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक संजय भोसले हेही या वेळी उपस्थित होते.
सरपंचपदासाठी भैरववनाथ जनसेवा पॅनलचे रमेशनाना जाधव यांचा, तर उपसरपंच पदासाठी प्रमिला संतोष जगताप यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ जनसेवा पॅनेलने नऊपैकी नऊ जागांवर विजय मिळवला असल्याने ठरल्याप्रमाणे याही पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन थोपटे, अजित जाधव, राजेंद्र सस्ते, सदस्या तृप्ती जगताप, स्वाती पवार, नीलम सस्ते, लीलाबाई गायकवाड उपस्थित होते.
निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांचा जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, उद्योजक कल्याण जाधव, नीलेश जगताप, सुरेश सस्ते, माईसाहेब सस्ते आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी संग्राम सस्ते, बाळासाहेब काळे, युवराज जगताप, वामन सस्ते, मोहन जाधव, नारायण सस्ते, अंकुश कदम, पिंटूशेठ जाधव, काका जगताप, पोपट जगताप, राहुल भोंगळे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.