शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

शहरात रामनामाचा जयघोष

By admin | Published: March 29, 2015 12:27 AM

शहरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.

पुणे : शहरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. होम-हवन, रामजन्म, महाप्रसादाचे वाटप, भक्तिगीत कार्यक्रम, मिरवणुका, पालखी सोहळा आदी कार्यक्रम शनिवारी दिवसभर सुरू होते. त्यामुळे उपनगरे भक्तिमय वातावरणात चिंब झाल्याचे चित्र होते.४रामनवमीनिमित्त प्रतिशिर्डी शिरगाव येथे सुहासिनींच्या हस्ते रामजन्म पाळणा गाऊन रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शीतपेय, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख ट्रस्टी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी उपस्थित होते.४कॅम्प भागातील श्री सूर्यमुखी मंदिरामध्ये सत्यनारायण पूजा, आरती, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनजितसिंग विरदी, नगरसेवक अतुल गायकवाड, राजन परदेशी, विकास रेड्डी, प्रसाद गायकवाड, मुस्तफा शेख, संजय यादव, अमित रोपळेकर, पोलिस निरीक्षक, नितीन जाधव, मेजर सिंग कलेर, सूरज अगरवाल, भारत शेलार उपस्थित होते.४भवानी पेठेतील मेहतर बाल्मिकी समाज पंचायतच्यावतीने राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिस्थापना व कलशाची स्थापना करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष शैलेंद्र जाधव, सरचिटणीस निलेश चव्हाण, मंगेश चंद्रमौर्य, बंडोपंत उमंदे, वीरदास चव्हाण, नगरसेवक सुधीर जानजोत, भिकाचंद मेमजाते, चंद्रकांत चव्हाण, दशरथ रामानंदी, सूर्यकांत चव्हाण, खेमचंद साळुंखे, किनोद मकवाना, सूरदास चव्हाण, रमेश चव्हाण, राजेंद्र धर्मराज, सतीश लालबिगे उपस्थित होते. श्री संत नामदेव शिंपी समाज मंदिरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी रजनी देशपांडे यांचे कीर्तन, दीपक कुलकर्णी व उज्वला शिंदे यांनी भक्ती संगीत व गुरूकृपा भजनी मंडळाने भजन सादर केले.४नवयुग तरूण मंडळ श्री साईबाबा भव्य उत्सव समितीच्यावतीने होमहवन, आरती, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान मित्र मंडळाच्यावतीने रामनवमीनिमित्त श्री साईबाबा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी साईपूजन, साई आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले.४ साईबाबा मंदिर उत्सव समितीच्यावतीने महापूजा, आरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हुसेन भाई, विशाल मोरे, गौरव व्हावळ, समीर शेख, कुणाल पूजानी, चिमन शेख, योगेश चाफेकर, प्रीतम व्हावळ, आशिष परदेशी, युसफ शेख उपस्थित होते.धानोरीत विविध कार्यक्रमधानोरी : येथील आनंद पार्कमधील साई मंदिरात रामनवमी व साई जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आनंदपार्क, भैरवनगर, महाराणा प्रताप चौक, आय्यप्पा उद्यान, छत्रपती शिवाजी चौक परिसरातून साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोलताशा व झांजपथक, भजनी मंडळे तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंडित हर्षकुमार दळवी व सहकारी यांच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक अनिल टिंंगरे, माजी नगरसेवक सुनील टिंंगरे, हनिफ शेख, अ‍ॅड. नानासाहेब नलावडे, सुनील खांदवे-पाटील आदी उपस्थित होते.रामनवमी व जन्मोत्सव उत्साहातधनकवडी : आंबेगाव पठार, धनकवडी, बालाजीनगर या भागांमध्ये उत्साहात राम जन्मसोहळा पार पडला. दुपारी रामचंद्रांच्या जयघोषात महिलांकडून पाळणा गाऊन, फुलांच्या वर्षावात व सुठंवडा वाटून राम जन्मउत्सव साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच महाअभिषेक, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी हरिपाठ यांबरोबरच हरिजागराचा कार्यक्रमही पार पडला. मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी होती. नगरसेवक अभिजित कदम, नगरसेविका कल्पना थोरवे, अ‍ॅड. संभाजी थोरवे यांच्या हस्ते व परिसरातील रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरतीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी रमेश दवे, जोशी गुरुजी, श्रीराम मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष रामचंद्र मोरे आदी उपस्थित होते. धनकवडीत राजर्षी शाहू बँक चौक ते धनकवडी गावठाणापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. घोरपडीत विविध कार्यक्रमघोरपडी : रामनवमीनिमित्त घोरपडी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बसंत हायस्कूल येथील राममंदिरात संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी बसंत हायस्कूलपासून तालिम चौकपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी प्रवीण कन्नन, कविराज स्वामी, मौला, रंजित पिल्ले, लॉरेन्स जोसेफ, आनंद उपस्थित होते. घोरपडी रेल्वे फाटक येथील साईमंदिरात महाअभिषेक, साईभजन, कीर्तन, महाप्रसाद भंडारा आयोजन करण्यात आले होते. योगेश शेलार, गणेश कांबळे, प्रकाश काळे, कैलाश साखरे, तुषार सावंत, रवी कदम, संदीप परदेशी राजेश साळुंके उपस्थित होते.संगीत रामकथावारजे : वारजे, कोथरूड भागात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डहाणूकर कॉलनीतील राममंदिरात संगीत रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्या हस्ते आरती झाली. सुमारे १२ हजार लोकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी भाविकांची मंदिरापासून ते डहाणूकर सर्कल पर्यंत रांगा लागल्या होत्या. या वेळी नगरसेविका संगीता देशपांडे, श्याम देशपांडे उपस्थित होते. वारजे येथील श्री पावशा गणपती मंदिरातही अजितअप्पा मार्जिणे यांचे रामजन्म कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी वारजे पूल ते गणपती माथा मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. अरुण दांगट, दिनकर दांगट, बाळासाहेब पोळ, तानाजी खेडेकर, काळुराम दोडके, अनुप जोशी उपस्थित होते. कोथरूडमध्ये आकर्षक सजावटकर्वेनगर : कर्वेनगर परिसरात रामजन्म उत्साहात साजरा करण्यात आला. या भागातील मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि दिवसभर कीर्तन, प्रवचन, पठण, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गीते गायली. गुरुजन सोसायटीमधील मंदिरात आठ दिवस ग्रंथाचे वाचन करण्यात आले. आज पहाटेपासूनच अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मिरवणूक काढून दुपारी रामजन्म झाला. याप्रसंगी भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.