बारामतीत रामराजे नाईक - निंबाळकर यांची अजित पवारांशी भेट; अजित दादा म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 02:07 PM2021-07-25T14:07:29+5:302021-07-25T14:14:48+5:30
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कोरोना आढावा बैठक पार पडली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पुणे: महाराष्ट्रातील पाऊस, पूरपरिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांचा राज्यात दौरा चालू आहे. काल ते पुण्यात कोरोना आणि पावसाचा आढावा घेण्यासाठी आले होते. आज सकाळी बारामतीत त्यांची कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी रामराजे नाईक - निंबाळकर त्यांना भेटले.
याबाबत अजित दादांना विचारले असता ते म्हणाले. निंबाळकर मला त्यांच्या कामासंदर्भात भेटण्यासाठी आले होते. त्यांचे काम झाले ते निघून गेले. या संदर्भात काही बोलण्यासारखे नाही. सध्या आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देऊ, अशा शब्दात पवार यांनी रामराजे नाईक - निंबाळकर यांच्यावरील प्रश्नास उत्तर देण्यास नकार दिला.
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कोरोना आढावा बैठक पार पडली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आता आपल्या जनतेसमोर पुराचे मोठे संकट आले आहे. त्यावर आपण लक्ष देऊ असे सांगून पवार म्हणाले, कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री अधिकारी समन्वय राखून पुर परिस्थिती हाताळत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पाण्याचा फुगवटा असल्यामुळे अजुनही परिस्थिती बिकट आहे. या संकटात अडकलेल्या जनतेला राज्यसरकार सर्वोतपरी सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तातडीने निर्णय घ्या
दरडी कोसळून आणि भू सख्कलनामुळे दुर्दैवाने काही मृत्यू झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध खात्याचे मंत्री पुरग्रस्त भागात फिरत आहेत. मी देखील आज सातारा तर उद्या सांगली आणि कोल्हापूर भागाचा दौरा करणार आहे. या भागातील जनतेसाठी तातडीने शिवभोजन थाळी मोफत सुरू करण्यात आली आहे. धान्यामध्ये तांदुळ , डाळ व अन्न शिजवण्यासाठी रॉकेल तसेच फुड पॅकेट, पाण्याच्या बाटल्या पोहचवण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पाण्याचा फुगवटा कमी करण्यासंदर्भात सध्या उपाययोजना सुरू
आतापर्यंत १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या भागातील पालकमंत्री, विभागिय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. अजुन काही मदत तसेच उपाययोजना करण्यासंदर्भात बैठका होणार आहेत. पाण्याचा फुगवटा कमी करण्यासंदर्भात सध्या उपाययोजना सुरू आहेत. अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर नद्यांमधून पाऊने तीन लाख क्युसेक पाणी अलमट्टीमध्ये जात आहे. नौदल, वायुदल तसेच सैन्यदल, एनडीआरएफ, एसटीआरएफ बचाव तुकड्या मदतीसाठी आलेल्या आहेत.