गराडे : श्रीक्षेत्र कोडीत येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या रंजना खुटवड-बडदे यांची तर उपसरपंचपदी विकास काशिनाथ जरांडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अलका किणीकर यांनी केली.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ज्योती जाधव यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शंकर बडदे , गौरव विष्णूदादा भोसले, अक्षय प्रकाश राजिवडे , , आशा किसन जरांडे , संगिता सुरेश जरांडे उपस्थित होते.
निवडप्रसंगी तुकाराम बडदे , योगेश खुटवड , महेंद्र जरांडे , दादा बडदे , उमेश बडदे , काका जरांडे , रमेश जरांडे , विनायक जरांडे , नामदेव जरांडे , काशिनाथ जरांडे , महादेव जरांडे , संभाजी बडदे , सतीश बडदे , दादा बडदे , शंकर बडदे , नवनाथ जरांडे , संजय जरांडे , उमेश बडदे , बाप्पू बडदे , सोमनाथ बडदे , आप्पा बडदे , संदीप खुटवड , महेश खुटवड , अक्षय बडदे , सुरज बडदे , आविष्कार बडदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोडीत गावातील विकासकामांना निधी उपलब्ध करुन सर्व कामे जलदगतीने करणार असल्याचे रंजना खुटवड व विकास जरांडे यांनी सांगितले.
- कोडीत (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना खुटवड व उपसरपंचपदी विकास जरांडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना कोडीतकर ग्रामस्थ.