स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खंडणी प्रकरणातील
बारामती :पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने माळेगाव येथून फरारी आरोपीला ताब्यात घेत अटक केली. या आरोपीवर खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: श्रीराम उर्फ बापू जगन्नाथ माने (वय ३२, रा. माळेगाव, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मंचर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तो गेल्या एक वर्षापासून फरार होता. फरार आरोपींचे शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, हवालदार रविराज कोकरे, अनिल काळे, अभिजित एकशिंगे, विजय कांचन, धीरज जाधव यांनी बापू माने याला अटक केली. पुढील कार्यवाहीसाठी त्याला मंचर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंचर पोलीस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
२३०४२०२१-बारामती-१४