शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

महापालिका उपअभियंत्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 9:12 PM

हप्ता मागून तो दिला नाही म्हणून अतिक्रमण कारवाई करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़.

ठळक मुद्देहॉटेलवर अतिक्रमण कारवाई करु नये, यासाठी त्यांच्याकडे दर महा १० हजार रुपयांची मागणी

पुणे : हॉटेलचालकाकडे दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता मागून तो दिला नाही म्हणून अतिक्रमण कारवाई करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपअभियंता किशोर पडाळे यांच्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़. दोन दिवसांपूर्वी महापालिकेत मारहाण झाल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पडाळे यांनी फिर्याद दिली होती़. याप्रकरणी मनिष हेगडे (वय ४७, रा़ भवानी सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे़. ही घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान बिबवेवाडी -कोंढवा रोडवरील हॉटेल मेघदूत येथे घडली़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेगडे यांचे गॅलक्सी सोसायटीमध्ये हॉटेल मेघदूत नावाचे हॉटेल आहे़. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे निरीक्षकांनी हेगडे यांच्या हॉटेलवर अतिक्रमण कारवाई करु नये, यासाठी त्यांच्याकडे दर महा १० हजार रुपयांची मागणी केली़ हेगडे यांनी त्याला नकार देताच त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हॉटेलमधील मुख्य दरवाजाजवळ असलेले सिमेंटचे कट्ट्यावरील डीफ्रिज आणि लाकडी सर्व्हिस काऊंटरची तोडफोड केली़. हॉटेलच्या आतील बाजूस असलेले स्टीलचे पावभाजी काऊंटर,२० स्टीलच्या खुर्च्या व ५ स्टीलचे टेबलाची तोडफोड व नुकसान केले़. हेगडे यांना हॉटेलमधून बाहेर ओढले़ त्यांना याबाबतची कोणतीही पोहोच पावती न देता हॉटेलमधील सामान घेऊन गेले़. तसेच हॉटेलमधील मॅनेजर व स्टाफला शिवीगाळ करुन यापुढे हॉटेलमधील सामान काढून दिले नाही तर महापालिका कायदा ५३ प्रमाणे तुमच्यावर कारवाई करेन, अशी धमकी दिली आहे़. हेगडे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक व्ही़ एस़ देशमुख अधिक तपास करत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक व्ही़ एस़ देशमुख यांनी सांगितले की, फिर्यादी हेगडे यांनी अगोदर महापालिकेत तक्रार करण्याचा प्रयत्न केला़. त्यांना पोलिसांकडे तक्रार करायला सांगण्यात आल्याने त्यांनी आता फिर्याद दिली आ.हे़ याबाबत किशोर पडाळे यांनी सांगितले की, या हॉटेलवरील कारवाई बांधकाम विभागाने केली असून अतिक्रमण विभागाकडून त्यांना कर्मचारी पुरविण्यात येतात़. स्वत: महापालिका आयुक्तांनी या कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़. आपल्या मारहाण झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आल्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची कल्पना महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती़.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrimeगुन्हाPoliceपोलिस