३४ वर्षीय घटस्फोटित महिलेने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चेतन नारायण डोंगरे, नारायण डोंगरे व इतर तीन महिला अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे पहिले लग्न झालेले आहे. तसेच चेतन याचेही लग्न झालेले आहे. मात्र, चेतन याने ही बाब पीडितेला सांगितली नाही. तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून घटस्फोट देण्यास भाग पाडले. तिने घटस्फोट देताच चेतन याने तिच्याबरोबर आळंदी येथे दुसरा विवाह केला.
विवाहानंतर चेतन हा पीडितेला नांदावयास नेण्यास टाळाटाळ करू लागला. ती मात्र, मला नांदावयास न्या, असा तगादा लावत होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या चेतनने तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून मानसिक छळ केला. तिच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करू लागला. चेतन हा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पूनम जाधव व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.