शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

जन्मदात्यानेच जिवे मारण्याची धमकी देत मुलीवर केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 5:52 AM

मंचर : जन्मदात्या पित्याने जिवे मारण्याची धमकी देऊन आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची काळिमा फासणारी घटना गुरुवारी उघडकीस आली. खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे बलात्काराची ही घटना घडली असून नराधाम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधम पित्याची ...

मंचर : जन्मदात्या पित्याने जिवे मारण्याची धमकी देऊन आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची काळिमा फासणारी घटना गुरुवारी उघडकीस आली. खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे बलात्काराची ही घटना घडली असून नराधाम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधम पित्याची ११ वर्षे ५ महीने १७ दिवस वयाची मोठी मुलगी व ९ वर्षांची छोटी मुलगी आहे. या दोन अल्पवयीन मुली खडकवाडी येथे त्याच्या बरोबर राहतात. त्यांच्या आईचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वडील दारू पिऊन घरी आले. त्याने दरवाजाची कडी लावली आणि मोठ्या मुलीला पाय दाबण्यास सांगत तीच्यावर बलात्कार केला. मुलगी ओरडू नये म्हणून त्याने तीचे तोंड दाबून धरले. तू जर कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली. त्यामुळे ती गप्प राहिली. त्यानंतर तो सातत्याने तीच्यावर अत्याचार करत होता.सोमवारी रात्री १० वाजता हा नराधम बाप घरी आला. त्याने पुन्हा मुलीवर बलात्कार केला. तीने बापासमोर गयावया केली तरी त्याने न थांबता तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. मुलीच्या ओरडण्याचा आवाज रात्री तिच्या चुलतीने ऐकला होता. मंगळवारी दुपारी चुलतीने तिला विचारले असता या मुलीने भीतीपोटी काहीही सांगितले नाही. मात्र, नंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिने वडील बलात्कार करत असल्याची माहिती चुलतीला दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या अल्पवयीन मुलीच्या चुलता व चुलतीने ही माहिती रांजणगाव गणपती येथील मुलींच्या मावशीला कळविली. या प्रकरणी मावशीने मंचर पोलिसांत फिर्याद दिली. पोलीसांनी नराधम पित्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस