चाकण : परिसरात नोकरी शोधायला आलेल्या महिलेला आळंदी रोडवरील रोटाई तळ्याजवळील वनविभागात निर्जन ठिकाणी नेऊन ओमनी वाहनचालकाने चाकूचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देऊन मोशी येथील एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी मंगेश आगळे (वय अंदाजे ३०, पूर्ण नाव, पत्ता नाही) या वाहनचालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार वाहनचालकाचे अंदाजे वय ३० असून अंगाने सडपातळ, उंच, गोरा रंग, केस वाढलेले, आडवा भांग असे आरोपीचे वर्णन आहे. थोड्या वेळापूर्वी चाकण बाजूकडे जाताना चालकाने विचारपूस करून महिलेचे नाव व मोबाईल नंबर घेतला होता व महिलेनेही चालकचे नाव व मोबाईल नंबर घेतला होता. दरम्यान, चाकणच्या अगोदर सर्व पॅसेंजर उतरले. आळंदी फाट्याला ट्रॅफिक जाम असल्याने आपण आळंदीमार्गे जाऊन लवकर पोहोचू, असे वाहनचालकाने सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मोशी येथील ३२ वर्षीय महिला ही भाम येथील टाटा कंपनी येथे काम शोधण्यासाठी आॅटो रिक्षाने आळंदी फाट्याला उतरली. तेथून ओमनी गाडीने भाम येथे टाटा कंपनीमध्ये जाऊन नोकरीची चौकशी करून परत भाम स्टॉपवर आली असता तीच ओमनी पुण्याकडे जाणाऱ्या या बाजूला रस्त्यावर उभी होती. तेव्हा पीडित महिलेने मोशीला जाणार का, असे विचारून ड्रायव्हरशेजारी बसली. त्यानंतर आळंदी रोडने जाताना तळ्याजवळील रस्त्याने गाडी वनविभागात वळवली व कच्च्या रस्त्याने घेऊन जाऊ लागला. फिर्यादी महिलेने गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने महिलेच्या कमरेस चाकू लावून मारून टाकण्याची धमकी दिली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मोशी येथील ३२ वर्षीय महिला ही भाम येथील टाटा कंपनी येथे काम शोधण्यासाठी आॅटो रिक्षाने आळंदी फाट्याला उतरली. तेथून ओमनी गाडीने भाम येथे टाटा कंपनीमध्ये जाऊन नोकरीची चौकशी करून परत भाम स्टोपवर आली असता तीच ओमनी पुण्याकडे जाणाºया बाजूला रस्त्यावर उभी होती. तेव्हा पीडित महिलेने मोशीला जाणार का, असे विचारून ड्रायव्हरशेजारी बसली.
प्रवासी महिलेवर बलात्कार; आळंदी रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 2:08 AM