शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

भीक मागून उदरनिर्वाह करणा-या कुूटुंबातील एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:19 PM

तिचं वय अवघं एक वर्ष... ती गेल्या दोन दिवसांपासून गायब होती..रस्त्यावर मिळालेल्या भीकेत आपली उपजीविका भागवणारे तिचे कुटुंब... पण अवघ्या एक वर्ष वयातच वासनेने पिसाट झालेल्या नराधमाची ती शिकार ठरली...यातच तिने या निर्दयी जगाचा निरोप घेतला...

ठळक मुद्देनशेच्या गुंगीत केलेल्या बलात्कारात मुलीचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा डॉक्टरांचा अहवाल

लोणीकाळभोर :  एक वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे लोणी स्टेशन परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चार तासांमध्ये एकाला अटक केली आहे. आरोपीने सदर कृत्याची कबुली दिली आहे. आरोपीविरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याप्रकरणी मल्हारी हरिभाऊ बनसोडे ऊर्फ हड्डीपप्या (वय २२, रा. कदमवाकवस्ती, जिल्हा परिषद शाळेशेजारी, ता. हवेली) या मद्यपी तरूणास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रूकम्मा सुब्रह्मण्यम (वय ६५, रा. गुरूराजपालयम, आंबुर जवळ, वेल्लुर, चेन्नई, तामिळनाडू) यांनी फिर्याद दिली आहे. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार उदरनिवार्हाचे साधन शोधण्यासाठी रूकम्मा या आपली सून कविता, तिचा मुलगा गणेश (वय ८) नात पुष्पसती व तिच्या मुली पूजा (वय २) व सुहासिनी (वय १) यांच्यासमवेत दहा दिवसांपूर्वी रेल्वेने लोणी काळभोर येथे आले होते. निवा-याचे साधन नसल्याने पहिले सहा दिवस त्यांनी लोणी रेल्वे स्थानकावरच मुक्काम केला. त्यानंतर तेथे राहण्यास मनाई केल्याने गेल्या चार दिवसांपासून ते सर्वजण दिवसभर भीक मागून रात्रीच्यावेळी पुणे - सोलापूर महामार्गालगत असलेल्या जय कृष्णा गारमेंट या दुकानापुढे असलेल्या मोकळ्या जागेत मुक्काम करत होते. मंगळवारी (दि.१४ जून ) रात्रीपासून सुहासिनी हरवली होती. अखेर शुक्रवारी (१५ जून ) रोजी पहाटे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या एसटी थांब्यामागे असलेल्या मोकळ्या जागेत सुहासिनी मृत अवस्थेत आढळली होती. तिच्या शरीरावर ओरखडल्याच्या जखमा होत्या. मयत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.        बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड, जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने आसपासच्या परिसरात शोध घेतला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकजण मुलीला घेऊन जाताना दिसला. मल्हारी बनसोडे याने नशेच्या गुंगीत केलेल्या बलात्कारात तिचा गुदमरून ती मृत्यूमुखी पडली असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस