पुणे : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
संजय मोहिते (वय ४२, रा. विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कोरेगाव पार्कमधील वसंत लता सोसायटीत मे २०१९ पासून घडली आहे.
संजय माहिते याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शरीरसंबंध केले. तो वारंवार आपण लवकर लग्न करू, असे सांगून आश्वासन देत होता. दीड वर्षापासून संजय मोहिते याच्याकडे लग्न करण्याबाबत वारंवार मागणी करू लागले. त्याने खोटे आश्वासन दिले. मार्च २०२१ पासून त्याचा संपर्क कमी होऊ लागला. तेव्हा फिर्यादी या २० जून रोजी त्याच्या कोरेगाव पार्क येथील फ्लॅटवर त्याला भेटायला गेल्या. तेथे एक महिला होती. तिच्याबाबत त्याला विचारल्यावर ती मैत्रिण असल्याचे सांगू लागला. त्यातून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यानंतर संजय मोहिते याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.