शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर बलात्कार, दोघा सख्ख्या भावांवर बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:21 AM

बारामती : गोंदिया जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर दोघा भावांनी नोकरीला लावतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली

बारामती : गोंदिया जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर दोघा भावांनी नोकरीला लावतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी फिर्यादी युवतीला जातिवाचक बोलून अपमानित करून शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी दोघा भावांवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवतीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ही युवती आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये ही युवती बारामतीत कामासाठी आली होती. आरोपी अमोल राघू म्हेत्रे व रवी राघू म्हेत्रे (दोघे रा. काझड बोरी, ता. इंदापूर) यांनी संगनमत केले. अमोलने फिर्यादीस नोकरी लावतो व लग्न करतो, असे आमिष दाखविले. तसेच आरोपी रवीने फिर्यादीस जिवे मारण्याच्या धमक्या देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. अमोलने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तीचा गर्भपात केला. तसेच दोघा आरोपींनी युवतीला जातिवाचक बोलून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दोघांवर बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसीटीचा गन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अमोलला अटक करण्यात आली आहे. तर रवि फरारी आहे. न्यायालयासमोर या आरोपीला हजर केले असता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.बी देशपांडे यांनी अमोल यास चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.>जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कारबारामती : वारंवार भीती दाखवून जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकारातून अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गर्भवती झाली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी रतन रामदास हेगडे (रा. अनंतआशानगर, बारामती) या आरोपीवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचे वय १२ वर्षे ९ महिने आहे. नोव्हेंबर २०१६ ते १७ नोव्हेंबर २०१७ दरम्यान, हा प्रकार घडला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे करीत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगPuneपुणे