शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाण्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 9:16 PM

पाणीसाठ्याच्या दृष्टीने कुकडी प्रकल्पातील हे सर्वात मोठे धरण असून सध्या या धरणात केवळ एकवीस टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला

डिंभे: डिंभे धरणाच्यापाणी साठ्यात झपाट्याने घट होत आहे. आज मितीस या धरणात केवळ २१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे साडेतेरा टीएमसी पाणी साठवण क्षमता आसणाऱ्या या धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. बाष्पीभवनाद्वारेही पाण्याची उत्सर्जन होत आहे. तर सध्या वीजगृहाद्वारे ५५० कुसेक्स तर सिंचनद्वारे ३०० कूसेक्स असे एकूण ८०० कुसेक्स इतक्या जलद गतीने धरणातून पाणी बाहेर पडत असल्याने दिव्य धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोड नदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात सध्या  झपाट्याने घट होत आहे. पाणीसाठ्याच्या दृष्टीने कुकडी प्रकल्पातील हे सर्वात मोठे धरण असून सध्या या धरणात केवळ एकवीस टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.  या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पारनेर करमाळा या तालुक्यातील गावे तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व शिरूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा अवलंबून असतो. यंदा सिंचनासाठी या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. तर सध्या या धरणातून वीजगृहाद्वारे ५५० कुसेक्स तर सिंचन द्वारे ३०० कुसेक्स असे एकूण ८०० कुसेक्स इतक्या जलद गतीने दररोज धरणातून पाणी बाहेर पडत आहे. यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून दिंडे धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे.

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावWaterपाणीDamधरणRainपाऊस