आई सीता कोंडिबा चांदगुडे यांनी १९४४ साली त्यांचे लग्न झाले, तेव्हा सुरुवातीस मोघलकालीन व ब्रिटिशकालीन नाणी जमा केली. आईच्या पश्चात्य चांदगुडे यांनी तो छंद कायम ठेवला आहे. यामध्ये १९३६, १९३९, १९४४, १९४५ मध्ये तयार झालेल्या नाण्यांचा देखील सामावेश आहे. काही नाणी मोघलकालीन असल्याने त्यांच्यावरती कसलाही उल्लेख नाही. परिसरामध्ये एखाद्या दुकानांमध्ये जरी नवीन नाणे आले तरी आवर्जून चांदगुडे यांना बोलवतात व त्यांना नाणे दिले जाते.
एकदा दौंडला चहा पीत असताना चांदगुडे यांना ५० पैशाचे जुने नाणे नजरेस पडले त्यांनी संबंधित चहावाल्याकडून ते नाणे १० रुपयांत विकत घेतले. बार्शी येथे एकदा २० रुपयाची जुनी नोट कालबाह्य दिसत असल्यामुळे कोणीच घेत नव्हते. चांदगुडे यांनी आवर्जून संबंधित व्यक्तीकडून घेतली. त्यांना या कामी मुलगा विठ्ठल चांदगुडे व आदित्य थोरात मदत करत आहेत. यासंदर्भात माणिक चांदगुडे म्हणाले की, पुढील पिढीला जुन्या नाण्यांची व नोटांची ओळख व्हावी, या उद्देशातून मी हा छंद जोपासला आहे.
२१ केडगाव
चलनी नोटा व नाण्यासोबत माणिक चांदगुडे.