पुणे : पीएमपी बसचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणीत आढळून आले आहे़ भाडेतत्वावर घेतलेल्या तसेच त्यांच्या स्वत:च्या बसवरील चालकांच्या रॅश डायव्हिंगचा फटका पीएमपीला बसला आहे़ वाहतूक शाखेने तब्बल २०० बसवर कारवाई करुन त्यांच्यावर ८४ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले की, वाहतूक शाखेतील सुसज्ज नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूकीचे नियमभंग करणाऱ्यांना फोटोसह थेट ई चलान पाठविले जाते़ पीएमपी चालकांकडून मोठ्या प्रमाणावर वाहतूकीच्या नियमांचा भंग केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या़ त्यामुळे वाहतूक नियमभंग करणाºया पीएमपी बस वाहतूक शाखेने सीसीटीव्हीत कैद झाले त्यांच्या बस क्रमांकाच्या नावाने ई चलान काढण्यात आले़ बस क्रमांकाचे फोननंबर नसल्याने ते ई चलन त्यांना गेले नव्हते़ त्यामुळे पोलिसांनी सुरु केलेल्या मोहिमेत पीएमपीने भाडेतत्वावर ठेकेदारांकडून घेतलेल्या २८६ बसचे क्रमांक तपासले़ त्यापैकी १३७ बसनी वाहतूक नियमभंग केल्याचे आढळून आले़ त्यांना ६२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठविण्यात आला़ तसेच पीएमपी स्वत: चालवित असलेल्या १७९ बसची तपासणी केली त्यामध्ये ६३ बसच्या नावाने ई चलन असल्याचे दिसून आले़ या बसच्या नावाने २२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे़ ही दंडाची रक्कम भरावी, यासाठी पीएमपीशी पत्रव्यवहार केला असून प्रशासनाने हा दंड एकत्रितपणे देणार असल्याचे कळविले आहे़
रॅश डायव्हिंगचा पीएमपीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 2:17 AM