राहू : दौंड तालुक्यात गुऱ्हाळाला दोन हजार पाचशे रुपये उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साखर कारखान्याऐवजी गुऱ्हाळालाला ऊस देण्यावर भर दिला आहे. या हंगामातील उसाला मिळणारा हा सर्वाधिक दर मानला जात आहे. दिलेल्या उसाला काटा पेमेंट मिळत असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.राहूबेट हे उसाचे आगर असल्याने उत्पादित उसापैकी बहुतांशी ऊस शेतकºयांनी खासगी कारखान्यांना घातला आहे; परंतु काहीशेतकºयांनी ऊस राखून ठेवल्याने आता गुºहाळाला चांगला दर मिळत आहे. ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी उसाचे पेमेंट अर्धवट दिले, त्या कारखान्यांकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. त्या साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना ऊसउत्पादक शेतकºयांनी शेतात प्रवेश करू दिला नसल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या दौंड तालुक्यात सरासरी गाळपासाठी सात लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी ऊस राखून ठेवला त्यांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.
गुऱ्हाळांचा दर कारखान्याला भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 2:24 AM