शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

रेशनिंगचा काळाबाजार करणारा स्थानबद्ध

By admin | Published: October 04, 2016 1:46 AM

रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर अत्यावश्यक वस्तूंचा कायदा १९५५च्या तरतुदींंनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून

पुणे : रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर अत्यावश्यक वस्तूंचा कायदा १९५५च्या तरतुदींंनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, गोरगरिबांच्या तोंडचा घास हिसकावणाऱ्या ‘रेशनिंग माफियांना’ यामुळे चाप बसण्यास मदत होईल. कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची एक वर्षासाठी अमरावती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारे करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. गोकुळ साहेबराव साबळे (वय ३३, रा. जुन्या हौदाजवळ, माळवाडी, हडपसर) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. साबळे याच्याविरुद्ध एकूण चार गुन्हे दाखल असून, अन्नधान्याच्या काळ्याबाजाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि जबर मारहाणीचाही गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल आहे. त्याने स्वत:ची संघटित टोळी तयार केली आहे. पुण्यातील रेशनिंग दुकानदारांना धमक्या देऊन तसेच मारहाण करून तो जबरदस्तीने रेशनिंगवरचे धान्य स्वस्त दरात विकत घेत होता. रेशनिंगचे धान्य खुल्या काळ्याबाजारात अधिक किमतीने विकत होता. मागील तीन ते चार वर्षांपासून तो हे रॅकेट चालवीत होता. निगडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०१३मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी १६,७५० किलो तांदूळ, ९ हजार ८०० किलो गहू आणि एक ट्रक असा १५ लाख ११ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या या गैरकृत्यांची माहिती अन्नधान्य वितरण कार्यालयात देण्याचा प्रयत्न केला असता त्याने गुन्हेगारांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्यावर तलवार व सत्तूरने वार केले होते. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या कारवायांबाबत खडक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे यांनी गुप्त माहिती काढली होती. १६ जून २०१६ रोजी सकाळी सहाच्या सुमारास मनपा वसाहतीमध्ये गव्हाच्या ५० किलोंच्या २०९ पोत्यांसह ताब्यात घेण्यात आले होते. रेशनिंगच्या पोत्यांमधून हे धान्य साध्या पोत्यांमध्ये भरण्यात येत असतानाच पोलिसांनी कारवाई केली होती. त्याने आसपासच्या रेशनिंग दुकानदारांवर दहशत निर्माण केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.