पुणे : कोकणातील कुडाळ, मालवण, कणकवली, रत्नागिरी, लांजा येथे अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ येत्या २४ तासात कोकण अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे़सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याला सलग दुसºया पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर ताशी ४५ ते ५० किमीच्या वेगाने वारे वाहनार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्र्रात जाऊ नये, अशा सूचना त्यांना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
कोकणातल्या रत्नागिरी व रायगडला अतिवृष्टीचा इशारा, मराठवाड्यातही जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:39 AM