पायाखालची वाळू सरकल्याने धंगेकर रडीचा डाव खेळतायेत; धीरज घाटेंची टिका
By राजू हिंगे | Published: June 3, 2024 08:30 PM2024-06-03T20:30:04+5:302024-06-03T20:31:09+5:30
कसब्याच्या पोटनिवडणुकीत विजय झाल्याने ईव्हीएम आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास होता, आता पराभव दिसल्याने विश्वास उडाला का? घाटेंचा सवाल
पुणे: पुणे लोकसभा मतदारासंघासाठी १३ मे ला मतदान झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी १७ सी बाबत जिल्हाधिका०याकडे तक्रार केली आहे. मतदान झाल्यानंतर या बाबत त्यांनी तातडीने तक्रार करणे अपेक्षित होते. पण त्यांना आता साक्षात्कार झाला आहे. एक्झीट पोलने पुण्यात महायुतीचा विजय होईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या पायाखालची वाळु सरकली असुन रडीचा डाव खेळत आहे असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला
यावेळी माजी नगरसेवक अजय खेडेकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापुरकर, राघवेंद्र मानकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी १७ सी बाबत जिल्हाधिका०याकडे तक्रार केली आहे. यावर बोलताना धीरज घाटे म्हणाले, रविंद्र धंगेकर यांना पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे ते आदळआपट करत बालीशपणा करत आहे. मतदानापुर्वी धंगेकर यांनी सहकारनगरमध्ये पोलिस स्टेशन येथेही आंदोलन करत स्टंटबाजी करत आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. त्यावेळी त्यांचा ईव्हीएम आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास होता. आता यानिवडणुकीत पराभव दिसत आहे. त्यामुळे त्यांचा यंत्रणेवरील विश्वास उडाला का असा सवाल धीरज घाटे यांनी केला आहे.