पुणे : काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी सकाळी समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. अपक्ष म्हणून ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून राहण्याऐवजी थेट पक्षात प्रवेश केला असता तर चित्र कदाचित वेगळे असते, असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून निघतो आहे. धंगेकर सलग चार वेळा नगरसेवक म्हणून रविवार पेठ व त्या परिसरातील प्रभागातून निवडून आले आहेत. दोन वेळा शिवसेना एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. पालिका निवडणुकीच्या आधी त्यांनी मनसेचा त्याग केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश न करता त्यांनी सहयोगी सदस्य म्हणून राहणे पसंत केले. काँग्रेसनेही त्यांना पुरस्कृत केले. भाजपच्या गणेश बीडकर यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी रितसर काँग्रेसमध्ये प्रवेश करायला हवा होता, असे त्यांच्याच काही समर्थकांचे तसेच काँग्रेसच्याही काही पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. पक्षाचे सहयोगी सदस्य म्हणून पालिकेतील त्यांचे वर्तन स्वतंत्रच राहिले. पक्षाला फायदा होण्याऐेवजी काही वेळा पक्ष अडचणीत आला. त्याचाच फटका त्यांच्या उमेदवारीला बसला असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमधील काही सूत्रांनी सांगितले, की धंगेकर यांचे नाव आघाडीवर होते; मात्र ऐनवेळी ते पक्षाचे सहयोगी सदस्य असल्याचे व त्यांचा काही भरोसा नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यामुळे शिंदे यांचे नाव पुढे आले व उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली. शिंदे पुणे रेल्वे स्थानक परिसरातील रहिवासी आहेत. गेली अनेक वर्षे ते त्याच प्रभागातून निवडून येत आहेत. सुरुवातीपासून काँग्रेसमध्येच आहेत. मात्र ते कसबा विधानसभा मतदारसंघातील रहिवासी नाहीत, त्यांचे कार्यक्षेत्र कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहे. मात्र तिथून पक्षाचे शहराध्यक्ष असलेले रमेश बागवेच उमेदवार असल्यामुळे शिंदे यांची अडचण झाली असावी. तरीही कसबा विधानसभा मतदारसंघाचा आग्रह त्यांनी पक्षाकडे का धरला हे गूढच आहे. धंगेकर यांच्या पवित्र्यामुळे त्यांची अडचणच झाली आहे. ..........कसबा विधानसभेवर कायम डोळा कसबा विधानसभेवर त्यांनी कायम डोळा ठेवला. नगरसेवकपदाचा वापर त्यांनी त्यासाठीच केला. पालिका निवडणुकीपासूनच त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग विनामूल्य करून देण्यापासून ते कोणत्याही तक्रारीच्या निवारणासाठी २४ तास उपलब्ध होण्यापर्यंतचे प्रयत्न त्यांनी केले, मात्र काँग्रेसने त्याची दखल घेतलेली दिसत नाही
धंगेकरांची पश्चातबुद्धी : पक्षात प्रवेश केला असता तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 2:08 PM
काँग्रेसने दिली धोबीपछाड...
ठळक मुद्देधंगेकर सलग चार वेळा नगरसेवक म्हणून रविवार पेठ व त्या परिसरातील प्रभागातून निवडून आलेदोन वेळा शिवसेना एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास