पुणे: विधानसभा रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा गंभीर आरोपनेत्यांचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत. असाच प्रकार पुण्यामध्ये दिसून आला आहे. गणेश बीडकर यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नींवर गंभीर आरोप केला आहे. तर बाळा शेंडगे यांनी हा आरोप फेटाळला असून याबाबत पत्रकार परिषद घेवून खुलासा दिला आहे.
प्रतिभा धंगेकर यांच्यावर वक्फ बोर्डाची मालमत्ता हडपल्याचा गंभीर आरोप भाजप नेते गणेश बीडकर यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील महत्त्वपूर्ण अशा लक्ष्मी रोडवर ही मालमत्ता असून ती हडपल्याचा गंभीर आरोप भाजप नेते बीडकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पुण्यातील राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. डॉ. महंमदखान करीमखान व त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी १९३५ साली लक्ष्मी रस्त्यावरील १७ हजार ३०० फूट क्षेत्रफळ असलेली सुमारे कोटी रुपयांची मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह अन्य साथीदारांच्या साथीने हडप केल्याचा आरोप बिडकर यांनी केला. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी नुकत्याच दिलेल्या निकालात ही मालमत्ता ‘वक्फ’ बोर्डाची असल्याचे घोषित केल्यानंतर याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने तातडीने स्थगिती दिली आहे. यावर उत्कर्ष असोशिएट्सचे बाळा शेंडगे व त्यांचे वकील ऍड अरूण लंबगोल यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत खुलासा केला आहे. याबाबत मनपाने कोणत्याही प्रकारची कायदेशिर खातरजमा न करता बांधकाम थांबवले आहे. ही प्रक्रिया ही न्यायप्रविष्ठ आहे. दबावाखाली कामे केली जात असून सध्या निवडणूकीच्या तोंडावर असे खोटे आरोप केले जात आहेत. यावेळी शेंडगे म्हणाले , भाजपा नेत्यांचे हिंदूत्व कोणते? एकीकडे वक्फ बोर्ड विरोध करायचा आणि खोटे आरोप करून वक्फ बोर्ड जागा हडपली असा आरोप करीत आहेत. आम्ही सर्व भाडेकरूना मोफत घरे देण्यात आलेली असून त्यांचे नोंदणीकृत करारनामे करण्यात आले आहेत.