शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

संकेतस्थळ निर्मितीतून रवींद्र गुर्जर यांनी फोडला प्रचाराचा नारळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:53 PM

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत होणार असल्याने उमेदवारांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरूवात केली आहे. रवींद्र गुर्जर यांनी स्वत:चे संकेतस्थळ तयार करून मंगळवारी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे.

ठळक मुद्देसंकेतस्थळाचे उद्घाटन सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्या हस्ते झाले.अध्यक्षपदामागची भूमिका, उपक्रम राबवणार आहेत, याची विस्तृत माहिती या संकेतस्थळावर

पुणे :  बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत होणार असल्याने उमेदवारांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीतील पश्चिम महाराष्ट्रातील प्रबल उमेदवार राजन खान यांनी प्रचाराला बगल देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र गुर्जर यांनी स्वत:चे संकेतस्थळ तयार करून मंगळवारी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात एखाद्या उमेदवाराने स्वत: चे संकेतस्थळ निर्मित करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. ९१ व्या बडोदे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्या संकेतस्थळाचे (www.ravdragurjr.com) उद्घाटन सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मसाप पिपंरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे. साहित्य सेतूचे प्रा. क्षितिज पाटुकले, मॉर्डन महाविद्यालयाच्या अ‍ॅनिमेशन विभागप्रमुख प्रा. समीर नेर्लेकर उपस्थित होते. रवींद्र गुर्जर यांची संमेलानाच्या अध्यक्षपदामागची भूमिका आणि संमेलनानंतर कोणकोणते उपक्रम राबवणार आहेत, याची विस्तृत माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.  त्यांचे मनोगत सांगणारा आणि मराठी स्वायत्त विद्यापीठ, बदलापूरचे संस्थापक श्याम जोशी यांचे विचार व्यक्त करणारा व्हिडिओ यामध्ये आहे. रवींद्र गुर्जर यांचा जीवन पट उलगडून दाखवताना त्यांच्या जीवनातील रोमहर्षक घटना आणि त्यांच्या पुस्तकांची माहिती संकेतस्थळामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. वाचकांना त्यांची पुस्तके संकेतस्थळावरुन खरेदी करता येतील. या निमित्ताने रवींद्र गुर्जर यांनी ज्येष्ठ कादंबरीकार गुरूनाथ नाईक यांच्या औषधपचारासाठी रु. ११.०००/- चा धनादेश राजन लाखे यांच्याकडे प्रदान केला.

टॅग्स :literatureसाहित्यElectionनिवडणूक