वरिष्ठ पत्रकार आणि नॅशनल न्यूच चॅनेलवरील प्रसिद्ध अँकर म्हणून सर्वपरिचीत असलेल्या रविश कुमार यांची आजची सकाळ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून सुरू झाली. रविश कुमार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन सकाळी-सकाळीच व्हिडिओ शूट सुरू केलं. त्यावेळी, आपण पुण्यात आलो असल्याचं सांगत पुण्य-नगरीतील लक्ष्मी रोड या मध्यवर्ती ठिकाणातील दर्शन नेटीझन्सला घडवलं. रविश ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीचा चालक त्यांना पुण्यातील त्या रस्त्यांबद्दल माहिती देत होता.
रविश यांनी पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मार्गे आप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असा प्रवास केला. त्यानंतर, पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन त्यांनी घेतले. दगडूशेठ गपणती मंदिराजवळ येताच, मंदिर पाहून ते भारावल्याचे दिसून आले. ये मंदिर तो बहुतही बडा और भव्य है.... असे उद्गार रविश यांनी काढले. त्यानंतर, आपण येथे आलो आहोत, तर थांबायलाच हवं, असेही रविशने यावेळी लाईव्ह व्हिडिओत म्हटले.
पुण्यातील या प्रवासाचा व्हिडिओ रविश यांनी स्वत: शूट करून फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. कोणत्याही शहराला सकाळी सकाळी पाहायला छान वाटतं असं कॅप्शन टाकून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पुणेकरांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला. तसेच, रविश कुमार यांचे सोशल मीडियातून पुण्यात स्वागतही केल.
रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित
एनडीटीव्ही या हिंदी वाहिनीतून पत्रकार रवीश कुमार महिन्यापूर्वी आपला राजीनामा दिला. तेथे रवीश कुमार चॅनलचे फ्लॅगशिप शो हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाइमसह अनेक कार्यक्रम होस्ट करत असत. रवीश कुमार यांच्या राजीनाम्याची घोषणा करताना, चॅनलने एक अंतर्गत मेल पाठवला की त्यांचा राजीनामा तात्काळ रुपाने प्रभावी आहे. म्हणजेच आता रवीश कुमार एनडीटीव्हीसाठी शो करताना दिसणार नाहीत. रवीश कुमार यांना त्यांच्या पत्रकारितेसाठी दोनदा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार आणि २०१९ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.