लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी अनुद्गार काढल्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. शिवसेनेतर्फे जोडा-मारो आंदोलन करण्यात आले तर काँग्रेसतर्फे निषेधसभा घेण्यात आली.बळीराजा अद्दल घडवेलकर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शिव्या देऊन बळिराजाचा अपमान करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना आगामी काळात बळिराजा अद्दल घडवेल. शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येऊन सत्ता भोगणाऱ्यांनी शेतकऱ्यांना शिव्या, शाप देण्याच्या आधी लाज वाटली पाहिजे, अशा तीव्र शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी निषेध केला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कलाटे यांच्या नेतृत्वाखाली खा. दानवे यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी खा. दानवे यांच्या चपलेचा हार घातलेल्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी नगरसेविका रेखा दर्शिले, मीनल यादव, नगरसेवक अॅड. सचिन भोसले, नगरसेवक नीलेश बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख गजानन चिंचवडे, विनायक रणसुभ आदी उपस्थित होते. राहुल कलाटे म्हणाले, मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. कर्जाच्या खाईत बुडालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांशी संपर्कयात्रा सुरू आहे. मागील वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तूरडाळीचे भाव गगणाला भिडले होते. यावर्षी शेतकऱ्यांनी विक्रमी तुरीचे उत्पन्न घेतले. ही तूर शासनाने हमीभाव देऊन खरेदी करावी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.’’
रावसाहेब दानवेंचा निषेध
By admin | Published: May 13, 2017 4:46 AM