पुणे : शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून २०१८मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी काढले. यामुळे इयत्ता नववीमध्ये मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वीत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जावी, याबाबतचे परिपत्रक शिक्षण संचालकांनी काढले आहे. सर्व विभागीय उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना या आदेशाची प्रत देण्यात आली असून त्यांच्या अदिनस्त असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्यानंतर जून २०१८ च्या शेवटच्या आठवडयात फेरपरीक्षेचे आयोजन केले जावे. केवळ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येईल.फेरपरीक्षेसाठी मूल्यमापन पध्दती इयत्ता ९ वी मध्ये असलेल्या सरासरी पध्दतीप्रमाणेच राहील. मानसिकदृष्टया दिव्यांग असलेल्या ८० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वीतील मूलभूत संबोधांवर आधारीत प्रश्नपत्रिका आवश्यकता भासल्यास तयार करावी. गंभीर आजाराने (कॅन्सर इत्यादी) पिडीत विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टया दिव्यांगांसाठी तयार केलेल्या मूलभूत संबोध प्रश्नावलीची सवलत देण्यात यावी.नापास करण्याला बसेल आळाविद्यार्थ्यांना इयत्ता ८ वीपर्यंत नापास करता येत नाही; त्यामुळे ९ वीमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नापास करण्याचे प्रमाण शाळांमध्ये जास्त आहे. दहावीत शाळेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून विद्यार्थी थोडा जरी मागे पडला तर त्याला नापास केले जाते. विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळाल्याने नववीत नापास होणाºयांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
नववीचीही जूनमध्ये होणार फेरपरीक्षा, अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 5:28 AM