रांजणगाव सांडस : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील पिंपळदरा ओढा परिसरातील शेतकरी वर्गाला भीषण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. या भागातील शेंडगेवाडी तलाव आटल्याने विहिरी आणि बोअरवेलचीही पाणी पातळी घटली आहे. यामुळे शेतीसह या भागातील शेळ्या, मेंढ्या यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात शेतकऱ्यांनी ऊस, कांदा यासारखी पिके घेतली आहे. परंतु, हा तलाव आमदार अशोक पवार यानी एक वर्षापूर्वी चासकमान आवर्तन सोडून भरला होता. परंतु, त्यानंतर या तलावात पाणी न सोडल्याने या भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत.
आलेगाव पागा परिसरातील शेतकरी यांच्या सातबारावर चासकमान भू संपादन राखीव असा शेरा पडलेला असूनही या भागातील शेतकरी हा चासकमान पाणी आवर्तनपासून वंचित आहे. त्यामुळे या तलावात पाणी सोडल्यास या भागातील व ओढ्याजवळील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. त्यामुळे शेंडगेवाडी तलाव चासकमान आवर्तन सोडून भरावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो :