- अरविंद कोठारी, अध्यक्ष, मोबाईल असोसिएशन पुणे
—
अंशतः टाळेबंदी आम्हाला मान्य नाही. व्यावसायिक दुकाने सोडून इतर सुरू राहिल्यास कोरोनाचा प्रसार रोखल्या जाणार आहे का? टाळेबंदी करायची असेल तर ती कडकडीत करा. उद्योगांपासून सर्व बंद ठेवा. तरच साखळी तुटेल.
- महेंद्र पितळिया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ
----
बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली आहे. मात्र, प्लायवूड आणि इतर कच्च्या मालाची दुकाने बंद आहेत. आमचा बहुतांश व्यवसाय हा फोनवर मालाची मागणी नोंदवून होते. त्यामुळे दुकानात बसून मालाची मागणी नोंदविण्याची परवानगी द्यावी. आलेला माल उतरवून घेण्याची आणि मालाच्या गाड्यांच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. टाळेबंदी संदर्भात सरकार घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे.
- मोहन पटेल, अध्यक्ष, पूना प्लायवूड डीलर्स असोसिएशन
-—-
गेल्या टाळेबंदी काळात व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले. सरकारला टाळेबंदी करायची असल्यास कामगार वेतन, दुकान-गोदाम भाडे, वीज, टेलिफोन बिल, कर्जाचे हप्ते, त्यावरील व्याज, व्यावसायिक कर यासाठी अनुदान द्यावे. भाजी मंडई आणि इतर व्यवसाय-उद्योगांमुळे कोरोना प्रसार होत नाही का? सरकारला खरेच टाळेबंदी करायची असेल तर संपूर्ण करा. अंशतः नको.
- मनोज सारडा, अध्यक्ष, पुणे जिल्हा होजिअरी, रेडीमेड अँड हँडलूम असोसिएशन
----
स्टीम बाथ, व्हेपरायझर, हीटर, वॉशिंग मशीनसह पाच वस्तू विकण्यास सरकारकडे परवानगी मागितली होती. सरकारने परवानगी दिली नाही. मात्र आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. सरकार घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे.
- मीठालाल जैन, अध्यक्ष, पूना इलेक्ट्रॉनिक हायर पर्चेस असोसिएशन