शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाण्यासाठी पालिकेला पुन्हा इशारा, धरणातील साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 2:48 AM

धरणातील साठा कमी : कपात केली नाही तर शेतीचे उन्हाळी आवर्तन रद्द

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहराच्या पाणी कोट्याबाबत जलसंपदाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर जलसंपदाने महापालिकेला पाण्याबाबत पुन्हा इशारा दिला आहे. महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही, तर दौंड, इंदापूरला शेतीसाठी द्यायचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेला बजावण्यात आले असल्याचे समजते. पाणी कमी करण्याची ही पूर्वतयारीच असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिका पाणीपुरवठा अधिकाºयांसमवेत जलसंपदाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी मंगळवारी ही बैठक घेतली. त्यात महापालिकेला शहरातील पाणी वितरणातील गळती थांबवण्याची तंबी देण्यात आली. धरणसाखळीत मागील वर्षापेक्षा सव्वापाच टक्के (५.०१ टीएमसी) कमी पाणीसाठा आहे. तो दररोज कमी होत चालला आहे. शेतीसाठी, तसेच वरील दोन तालुक्यांमधील काही गावांना पिण्यासाठीही पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदाची आहे. महापालिका असेच दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी उचलत राहिल्यास या गावांना उन्हाळ्यात पाणी देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेला सांगण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

महापालिकेसाठी लोकसंख्येच्या आधारावर ८.१९ टीएमसी वार्षिक कोटा हा जलसंपदाचा निर्णय कायम ठेवतानाच प्राधिकरणाने महापालिकेला ३१ पानांचा एक आदेशही बजावला आहे. त्यात वॉटर आॅडिट करून घेण्याबरोबरच पाण्याच्या काटकसरीचे अनेक उपाय सांगण्यात आले असून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी व त्याचा सविस्तर अहवाल जलसंपदाला सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे वॉटर आॅडिट त्वरित सुरू करण्याबाबत महापालिकेला मंगळवारी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.जलसंपदाच्या या भूमिकेमुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्यावरपरिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांमध्ये आहे.१ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणीरोज घेतले जात आहे. तेच संपूर्ण शहराला पुरवताना अधिकारीत्रस्त झाले आहेत. अजूनहीशहराच्या वेगवेगळ्या भागातून पाण्याला प्रेशर नसल्याच्या, पाणी पुरेसा वेळ येत नसल्याच्या तक्रारीयेत आहेत.प्रेशर कमी झाल्यामुळे सर्वाधिक अडचण शहरांमधील सोसायट्यांची झाली असून त्यांना इमारतींवरील टाक्या भरता येणे अशक्य झालेआहे. त्यामुळे सदनिकाधारकांना वेळेवर पाणी मिळत नाही. पाण्याच्या या प्रश्नाने अद्याप जोर धरला नसला तरी पाणी आणखी कमी झाले तर मात्र पुन्हा शहरात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.पाणी काटकसरीबाबत जागृती करावी1150दशलक्ष लिटर मंजूर कोटा असतानाही महापालिका १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत असल्याचे या बैठकीत महापालिका अधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यात आले.प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्यास वार्षिक ८.१९ टीएमसी याप्रमाणे दररोज फक्त ६९२ दशलक्ष लिटर पाणीच पुण्याला द्यावे लागेल, असेही बजावण्यात आले.४त्यामुळे १ हजार १५० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, असे महापालिकेला सांगण्यात आले आहे. इतके पाणी पुरेसे होत नसेल तर त्यासाठी महापालिकेनेच शहरात पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, वितरणातील गळती थांबवण्याचे कसोशीने प्रयत्न करावेत, असे बैठकीत बजावण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण