शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

वाचनसंस्कृतीसाठी पुस्तक दिंडी

By admin | Published: March 29, 2017 2:40 AM

गुढी चैतन्याची, मांगल्याची गुढी संस्काराची आणि पुस्तकांची, असे म्हणत वाचनसंस्कृती जोपासण्याचा दिलेला संदेश... भाषासंवर्धनाचा संकल्प

पुणे : गुढी चैतन्याची, मांगल्याची गुढी संस्काराची आणि पुस्तकांची, असे म्हणत वाचनसंस्कृती जोपासण्याचा दिलेला संदेश... भाषासंवर्धनाचा संकल्प करीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असलेली पुस्तक दिंडी आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेली तरुणाई अशा उत्साही वातावरणात ‘सण करू साजरे, माध्यम जरा वेगळे’ हे ब्रीद जपणाऱ्या तरुणाईने गुढीपाडव्यानिमित्त पुस्तक दिंडी काढली. मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे बाजीराव चौकापासून सकाळी १०.३० वाजता आचार्य अत्रे सभागृहात पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राज्य उत्पादन शुल्क पुणेचे अधीक्षक मोहन वर्दे, लष्कर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, प्रा. सुरेश माळी, दिलीप कोटीभास्कर, डॉ.सचिन वानखेडे, सहेला संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, बालसदनच्या अश्विनी नायर, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी उपस्थित होते.मिलिंद जोशी म्हणाले, ‘सर्जनशील आणि संवदेनशील गुढीची उभारणी आज आपण केली आहे. या माध्यमातून नवनिर्मिती आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळणार आहे.’(प्रतिनिधी)

जगामध्ये सहा हजार भाषा आहेत. त्यामध्ये मराठी भाषेचा सतरावा क्रमांक लागतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी तरुणाईने पुढे यायला हवे. - डॉ. रामचंद्र देखणे