भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भेलके महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. भगवान गावित यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांची माहिती उलगडवून ग्रंथालय शास्त्राचा प्रवास उलगडताना सांगितले की, महान व्यक्तींचे चरित्र, कथा, कादंबऱ्या यांचे वाचन केले तर आपला सर्वांगीण तसेच बौद्धिक विकास होतो.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. भगवान गावित, आशिष परमार, महेश दळवी, स्वप्निल सरपाले आणि सुमित कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.