कोथरुड : पुणे अधिक स्वच्छ व सुंदर होणार असेल तर त्यासाठी स्वच्छता दूत म्हणून काम करण्यास देखील मी तयार आहे. यासाठी डॉक्युमेंट्री तयार केली व त्या माध्यमातून सोप्या शब्दात नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत माहिती देता आली व त्या माध्यमातून जनजागृती करता आली तर त्यासाठी वेळ व आवाज द्यायला तयार आहे, असे आश्वासन प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केले.शुभारंभ पटवर्धन बागेतील डा श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग क्रमांक १३ हा झीरो गार्बेज प्रभाग करण्याच्या दृष्टीने बसविलेल्या ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या वेगळ्या कचरा पेट्यांच्या उदघाटन प्रसंगी बर्वे बोलत होत्या.यावेळी आदर पुनावाला क्लीन सिटीस इनिशिएटिव्ह्ज च्या वतीने प्रभागाची त्रिलो मशीन, ग्लुत्तों मशीन व १०० कचरा पेट्या देण्यात आल्या. कार्यक्रमास नगरसेवक दीपक पोटे,माधुरी सहस्रबुद्धे, सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने,वरिष्ठ आरोग्य निरीक्षण दीपक ढेलवान, पोलीस निरिक्षक रेखा साळुंखे, जनवानीचे पावन बडगुजर,भाजपच्या प्रभाग अध्यक्ष गौरी करंजकर,सरचिटणीस बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,सुयश गोडबोले,मयूर देशपांडे,ऋत्विक अघोर,कल्पना पुरंदरे,मंगल शिंदे,निलेश गरुडकर,संगीताताई आडवडे,अनुराधा एडके, अपर्णा लोणारे,सुवर्णा काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.पटवर्धन बागेतील नागरिक चंद्रकांत भिसे,मालतीताई दाणी, अंजलीताई रोडे यांच्या हस्ते मुक्ता बर्वे यांना सन्मानित केले.
पुण्याची स्वच्छतादूत होण्यास तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:26 AM