चौकट १
पावणेतीन लाखाने खासगी केंद्रांवरील लसीकरण अधिक - २१ मे ते १२ जुलैपर्यंत खासगी रुग्णालयातील केंद्र व महापालिका केंद्रांची तुलना केल्या या काळातील एकूण ११ लाख ६२ हजार २७९ जणांच्या लसीकरणापैकी महापालिका केंद्रांमध्ये ४ लाख ४२ हजार ५९७ जणांनी मोफत लस घेतली.
-त्याचवेळी खासगी रुग्णालयातील केंद्रांमध्ये ७ लाख १९ हजार ६८२ जणांनी लस घेतली. या दोन्ही केद्रांवरील फरक २ लाख ७७ हजार ८५ आहे. चार महिने उशिराने सुरू झालेल्या खासगी लसीकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत असून, आजमितीला या केंद्रांकडे तब्बल ३ लाख १५ हजार ४९ लस शिल्लक आहेत.
चौकट २ :
‘ऑन दी स्पॉट’ नोंदणीची मागणी
महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर कोविन पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय लस मिळत नाही. अशावेळी नियोजित वेळेत संबंधित पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्यास अवघ्या काही सेकंदात स्लॉट बुक झाल्याचे दाखविले जाते. त्यातच ‘ऑन दी स्पॉट’ नोंदणीचा कोटा कमी असल्याने पोर्टलवरील नोंदणी रद्द करून महापालिकेच्या सर्वच केंद्रांवर ‘ऑन दी स्पॉट’ नोंदणी करून लस देण्याची मागणी पुणेकर करत आहेत.
चौकट
लसीकरण (कालावधी : २१ मे ते १२ जुलै)
सरकारी केंद्र : कोविशिल्ड - ४ लाख १ हजार ६४५
कोव्हॅक्सिन -४० हजार ९४३
खासगी केंद्रे : कोविशिल्ड - ६ लाख ७९ हजार ४९७
कोव्हॅक्सिन - ३३ हजार ९९५
स्पुटनिक - ६ हजार १९०
(फोटो मेल केला आहे)