पुणे : कोरोना पश्चात जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. वन बीएचकेमध्ये राहणारी मंडळी आता टू बीएचकेकडे वळू लागली आहेत. तसेच स्वतःचे घर तेही पुण्यात असावे, अशी भावना वाढू लागल्याने मत एसके असोसिएटचे संचालक सतीश कोकाटे यांनी सांगितले.
कोकाटे म्हणाले, पुण्याचा विस्तार सर्वच क्षेत्रात होत आहे. शिक्षण, आटोमोबाईल, उत्पादन, आयटी आदी क्षेत्रात पुण्याची घोडदौड सुरु आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढू लागली आहे. कोरोना संकटात आणि नंतर राहणीमानात प्रचंड फरक झाला आहे. वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळे सर्व कुटुंब घरीच असत. पूर्वी नोकरदार पुरुष आणि महिला घराबाहेर कामानिमित्त असत. घरी आली तर ती झोप आणि जेवणासाठी येत होती. आता घरातून काम करताना प्रायव्हसीची गरज निर्माण झाली. त्यासाठी मोठ्या जागेची गरज भासल्याने अनेक जण वन बीएचकेकडून अधिक मोठे टू बीएचके कडे वळले. त्यासाठी आम्ही बांधकामात बदल केले आहेत. प्रत्येक खोलीत इंटरनेट सुविधा, ऑफिस कम हाऊस असलेल्या एका स्वातंत्र खोलीला गॅलरी तयार केली आहे.
अनेक मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण
सरकारने घर खरेदीला आणि महसूल वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती दिल्या. त्यात स्टॅम्प ड्युटीत कपात केली. बँकांनी गृहकर्ज व्याज दरात कपात केली. त्यामुळे मासिक उत्पन्न 25 ते 40 हजार असणाऱ्यांनी घर खरेदीचा विचार केला. त्या मध्य आणि निमं माध्यमवर्गीयांचा समावेश आहे. त्याचा कल परवडणारी घरे घेण्याकडे होता. मी सुद्धा 2012 पासून गृहनिर्मिती क्षेत्रात आहे. तसेच अनेक परवडणारी घर, इमारत पुनर्निर्माण प्रकल्प उभे केले आहेत असे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात फ्लॅट देण्याचे वचन पाळले
कोरोना काळात आम्ही ग्राहकांचे हित पहिले. त्यांना सांगितलेल्या वेळेत फ्लॅट राहण्यासाठी उपलबध्द करून दिले. साठ वर्षांपूर्वीच्या इमारत पाडून तेथे नवीन इमारत उभारण्याचे म्हणजे पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. अशाच प्रकारचे प्रकल्प अन्य ठिकाणी सुरु आहेत. पुण्याबाहेर परवडणारे गृहप्रकल्प उभारता येणे शक्य असल्याचे सांगताना ते म्हणाले, वन बीएचके फ्लॅट 20 लाखांना आले तर टू बीएचके फ्लॅट 35 लाखांत जागा आणि परिसर यानुसार देता येणे शक्य आहे. तसेच गार्डन, क्लब हाऊस, जीम, योगासन, धावण्याचा ट्रक जागा मुबलक असेल तर त्या देता येतात. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे सोसायटीत मोकळी जागा फिरण्यासाठी हवी, अशी मानसिकता तयार झाली आहे. त्या दृष्टीने आम्ही गृहप्रकल्पाची रचना करीत आहोत.
इमारतीत क्लब हाऊस, जीम;
बांधकाम क्षेत्रात नवी कल्पना
इमारत, सोसायटी उभारताना अनेकदा प्रशस्त जागेचा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी फ्लॅट सोडून अन्य सुविधा पुरविणे अशक्य होते. परंतु अनेकांना अतिरिक्त सुविधा या आयुष्यभरासाठी हव्या असतात. त्या कशा द्यायच्या असा प्रश्न पडतो. त्यावर उपाय म्हणून अशा पहिल्या मजल्यावर आणि टेरेसवर मोकळी जागा ठेवली जाईल. तेथे गार्डन, क्लब हाऊस, जीम, योगासन, धावण्याचा ट्रॅक आदी सुविधा देण्यात येतील. विशेष म्हणजे या सुविधा रहिवाशांना अतिरिक्त रक्कम न आकारता पुरविणार आहे. अशी नवीन कल्पना बांधकाम क्षेत्रात प्रथम राबविल्याचे ते म्हणाले.
फोटो आहे