-सागर सुखवाणी,
संचालक सुखवाणी बिल्डटेक
प्रचलित ‘कोविड-19’ साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेचा पायाच हादरून गेला आहे आणि त्याचबरोबर आपले आयुष्यही बदलले आहे. परंतु, त्यातूनही व्यक्ती आणि व्यवसायिकांना केवळ आपापले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच नव्हे तर, उद्रेकाच्या या संपूर्ण काळामध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांसह डिजिटल जगातील संभाव्य संधी वाढविण्याचा पर्याय मिळाला आहे. या आव्हानात्मक काळातही, व्यवसायात चांगली वाढ करून आम्ही तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन या नवीन जगाच्या गरजा भागवून पारंपारिक पद्धतीमध्ये सुधारणा केल्या आहेत, अशी माहिती सुखवाणी बिल्डटेकचे संचालक सागर सुखवाणी यांनी दिली.
तंत्रज्ञानाने जवळजवळ प्रत्येक क्षेत्राची आणि उद्योगाची नव्याने व्याख्या केली आहे. रिअल इस्टेटही त्याला अपवाद नाही. कोविड-19 साथीच्या रोगामुळे डिजिटायझेशनची गती वाढली आहे आणि पारंपारिक व्यावसायाचे मॉडेलही बदलत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ करत असताना, तंत्रज्ञानाची ही गती टिकविण्यासाठी रामबाण औषध म्हणून काम करत आहे. ‘फेस-टू-फेस’ मीटिंगची जागा स्काईप आणि झूमवरील व्हर्च्युअल सत्रांनी घेतली आहे. दुकानामध्ये जाऊन खरेदी करण्याची जागा व्हिडिओ शॉपिंग आणि ई-कॉमर्सने घेतली आहे. रिअल इस्टेटमध्ये, ग्राहकांच्या अनुभवांना चालना देण्यासाठी, मजबूत ब्रँड रिकॉल तयार करण्यासाठी आणि ग्राहकांची गुंतवणतूक वाढविण्यासाठी विकसक तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग करीत आहेत.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आर्थिक परिणामांमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर, रिअल इस्टेट क्षेत्रासह, विविध उद्योगांना नवीन व्यवसाय करण्याचे मार्ग शोधण्याला आणि त्यानुसार बदल करण्यास भाग पाडले आहे. असाच एक सकारात्मक बदल म्हणजे तंत्रज्ञानाचा वाढता वापर होय. रिअल इस्टेट उद्योगातील तंत्रज्ञानाचे सर्वांत महत्त्वाचे आणि प्रचलित उदाहरण म्हणजे ऑटोमेशन होय. आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचे बाय-प्रॉडक्ट म्हणून, रिअल इस्टेटमध्ये ऑटोमेशन हे विविध मार्केटींग फंक्शन्स आणि व्यवसाय प्रक्रियांमध्ये दिसून येत आहे. ऑटोमेशन व्यापकपणे वापरलेली काही उदाहरणे म्हणजे वेबसाइट फॉर्मद्वारे लीड जनरेशन, ड्रीप ईमेलद्वारे किंवा ऑटोमेटेड वर्क फ्लोद्वारे लीड नर्चरिंग करणे होय. टास्क मॅनेजमेंट, खात्यांचे ऑटोमेशन, ''स्पॅक्टोरा'' द्वारे मालमत्तांची पाहणी करणे आदींचा यात समावेश आहे.
रिअल इस्टेट व्यवसाय अनेक वर्षांपासून सोडविण्याचा प्रयत्न करीत असलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कागदपत्रांचा वापर आणि त्यांच्यावरील अवलंबन होय. मध्यभागी डिजिटल प्लॅटफॉर्म ठेवून रिअल इस्टेट प्रक्रियेला सुलभ करणे, ही एक मोठी झेप आहे. जी व्यवसायाला ‘स्टे अॅट होम’द्वारे खरेदीदार आणि विक्रेत्यांची सेवा करण्यास मदत करत आहे. रिअल इस्टेटमधील या तंत्रज्ञानाचे फायदे अनेक आहेत. त्यामध्ये विश्वासार्ह सुरक्षितता आणि संग्राह्यता ऑपरेशन खर्च कमी करणे, रिअल टाईम सामाईकरण आणि अॅक्सेसिबिलिटी होय.
तज्ज्ञांच्या मते ‘कोविड १९’ने भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये डिजिटल साधने स्वीकारण्यास चांगलाच वेग आणला आहे. त्यांचा अनुभव असा आहे की, प्रॉपर्टी शोधणे तसेच ती शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करता येते. या आव्हानाच्या काळात कंपन्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व्यवसायामध्ये विशेषत: रिअल इस्टेट उद्योगामध्ये एका नवीन डिजिटल आणि तांत्रिक क्रांतीचीही सुरुवात असू शकते.
(सागर सुखवाणी यांचा फोटो जेएमएडीट वर आहे)