पुणे : नैसर्गिक विधीकरिता घराबाहेर आले असताना त्यावरुन एका महिलेने आरडाओरड केली असता त्यावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत एका व्यक्तीच्या हातावर व छातीवर कोयत्याने वार करण्यात आले. तसेच त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोंढव्यातील साळवे गाडर््न शेजारील चंदुकाका डोसा कॉर्नर येथे ही घटना घडली.
याबाबत निलेश वैजनाथ कटके (वय 36, रा. सम्राट टॉवर जवळ, सुखसागरनगर, कात्रज) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे. यात अली ईस्माईल चित्तापुरे (वय 21, रा. सम्राट टॉवर जवळ, सुखसागरनगर, कात्रज), प्रशांत मोहन शिवनळु (वय 23, रा. राजीव गांधी नगर, अप्पर इंदिरानगर) आणि स्वप्नील धोंडीराम शेडगे (वय 22) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी शेडगे यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कटके हा आरोपी चित्तापुरे यांच्या चुलत्याच्या घरात राहत होता.फिर्यादी 29 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस नैसर्गिक विधीकरिता बाहेर आले असताना आरोपीच्या ाईने त्यांना ‘नेहमीच बाहेर घाण करतोस’ असे सुनावले.
त्यानंतर फिर्यादी त्यांना उलटे बोलले असताना आरोपीच्या आईने फिर्यादीने आपला हात धरल्याचे सांगितले. आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ व हाताने मारहाण करत घर खाली करण्यास सांगितले. त्यामुळे फि र्यादी व त्यांचा भाऊ रवि कटके हे दुस़रीकडे राहण्यास गेले. 3 मे रोजी फिर्यादी व त्यांचा भाऊ हे त्यांचा डोसा विक्रीचा व्यवसाय करत असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीला ‘दोन मिनिटांत तुझा मुडदा पाडतो. तुझा गेम खल्लास’ असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारताना फिर्यादीचा हात मध्ये आला. त्यावेळी त्याच्या हातावर, गळयाजवळ व छातीवर वार झाले. याप्रसंगी फि र्यादीचा भाऊ मध्ये आल्याने आरोपींनी त्याच्यावर देखील वार करुन त्याला दगड मारुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पुढील तपास करीत आहेत.