ओतूर : मौजे डिंगोरे (ता. जुन्नर) डिंगोरे बल्लाळ वाडी रस्त्यावर राहत असलेल्या ५५ वर्षे महिलेचा जमिनीच्या वाटपाचे कारणावरून पुतण्याने चुलतीचा खून केला, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली.या गुन्ह्याबद्ल माहिती देताना बनसोडे म्हणाले, की खून झालेल्या महिलेचे नाव मंगल काशिनाथ लोहोटे (वय ५५) आहे. पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.शुक्रवार दि. १९ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. मृत मंगल लोहोटे एकट्याच घरी होत्या, तेव्हा त्यांचा पुतण्या रामदास नाथा लोहोटे हा चिडून घरात आला. त्यांचा जमिनीचा खटला न्यायालयात सुरू आहे. निकाल लागत नाही म्हणून आरोपी रामदास लोहोटे याने चिडून मृत मंगल लोहोटे यांच्या डोक्यावर व तोंडावर पक्क्या विटेने मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. मारहाण करून पुतण्या रामदास पळून गेला. ओरडण्याचा आवाजाने जवळपासचे लोक आले. त्यांनी जखमी झालेल्या मंगल लोहोटे यांना उपचारासाठी आळेफाटा येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. स. पो. नि. बनसोडे हे तेथे उपस्थित झाले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.या महिलेचा मुलगा प्रशांत काशिनाथ लोहोटे (वय २९) याने ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ओतूर पोलिसांनी प्रारंभी ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता परंतु आता कलम ३०२ अन्वये रामदास नाथा लोहोटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओतूर पो. ठाण्याचे स. पो. नि. सूरज बनसोडे हे पुढील तपास करीत आहेत. फरार आरोपी रामदास लोहोटे याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे.
जमिनीच्या वादातून जुन्नरमध्ये पुतण्याने केला चुलतीचा खून; खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 3:18 PM
मौजे डिंगोरे (ता. जुन्नर) डिंगोरे बल्लाळ वाडी रस्त्यावर राहत असलेल्या ५५ वर्षे महिलेचा जमिनीच्या वाटपाचे कारणावरून पुतण्याने चुलतीचा खून केला, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली.
ठळक मुद्देरामदास लोहोटे याने चिडून मंगल लोहोटे यांच्या डोक्यावर व तोंडावर पक्क्या विटेने केली मारहाण फरार आरोपी रामदास लोहोटे याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना