शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

वॉटरपु्रफिंगच्या नावाखाली पुनर्बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 2:10 AM

भुसार विभागातील गाळे : अनधिकृत बांधकामांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या गुलटेकडी मार्केट यार्डात भुसार विभागात वॉटरप्रुफिंगच्या नावाखाली अनधिकृतपणे गाळ्यांची पुनर्बांधणी सुरू आहे. सध्या या बांधकामाचा एक स्लॅब पूर्ण झाला आहे. परंतु बाजार समिती प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या बांधकामासाठी संबंधित बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये अर्थपूर्ण संबंधामुळे अशा अनधिकृत बांधकामांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा सध्या बाजार घटकांमध्ये सुरू आहे.मार्केट यार्डात गूळ-भुसार विभागात सध्या अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. किरकोळ दुरुस्त्यांच्या नावाखाली काही व्यापारी अनधिकृतपणे अतिरिक्त बांधकामे करत आहेत.

गूळ-भुसार विभागात गाळा नं. १९९, २०० आणि २०१ येथील पूर्वीचा गाळा पाडून त्या ठिकाणी नव्याने गाळ्याची उभारणी सुरू आहे. गाळा पुनर्बांधणीसाठी बाजार समितीसह महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मात्र, बाजार समितीकडून वॉटरप्रुफिंग परवानगीच्या नावाखाली संबंधित व्यापाºयांनी नव्याने गाळा बांधकाम काढले आहे. सध्या या बांधकामाचा एक स्लॅब पूर्ण झाला तरीही बाजार समिती प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाला बाजार समिती प्रशासन पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, संबंधित बांधकामाची पाहणी करून त्या बांधकामास परवानगी आहे का नाही, याची पडताळणी करून पुढील कार्यवाही करू, असे स्पष्ट केले.विभागप्रमुखाचे दुर्लक्षगुलटेकडी मार्केट यार्डात गूळ-भुसार, भाजीपाला, फळे, फुले, कांदा-बटाटा, पानबाजार आदी विभाग आहेत. संबंधित सर्व विभागांना विभागप्रमुख नेमण्यात आले आहेत. आपल्या विभागातील दैनंदिन कामकाजासह अनधिकृत बांधकामांची माहिती अतिक्रमण विभाग आणि समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्यावर कारवाईची जबाबादारी संबंधित विभागप्रमुखांची असते. मात्र, गूळ-भुसार विभागात अनधिकृत बांधकामे सुरू असतानाही त्याकडे संबंधित विभागाप्रमुखांचे दुर्लक्ष असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Puneपुणे