सगळ्यांचा लाडका चीज गर्लिक ब्रेड बनवणे झाले एकदम सोपे. ही घ्या भन्नाट रेसिपी.
साहित्य :
- मैदा पाव किलो
- कोमट पाणी अर्धी वाटी
- साखर एक लहान चमचा
- ड्राय यीस्ट एक लहान चमचा
- मीठ
- ओरीगानो
- चिली फ्लेक्स( सुक्या लाल मिरचीचे तुकडे )
- बारीक चिरलेली सिमला मिरची.
- बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या दोन
- चीज
- बटर
कृती :
- पाण्यात साखर विरघळवून घ्या.
- साखर विघळली की यीस्ट टाका आणि दहा मिनीटे झाकून ठेवा.
- दहा मिनीटानंतर त्यात मैदा, मीठ,ओरीगानो, चिलीफ्लेक्स टाका, व हळूवार मळा
- एकदा तेलाचा हात लावून मळलेलं पीठ दीड तास झाकून ठेवा.
- एका वाटीत बटर ,कोंथबीर, बारीक चिरलेला लसूण, ओरीगानो घालून एकत्र करून घ्या.
- कढईत खडे मीठ टाका व एक स्टँन्ड ठेवून प्री हिट करण्यासाठी अर्धा तास ठेवा.
- आता तयार पीठाचे दोन भाग करा.
- पहिल्यांदा एक गोळा मध्यम जाड लाटा. त्यावर बटरचे मिश्रण लावा.स्वीटकॉर्न व सिमला मिरची पसरवा व चीज किसा.व नंतर ओरीगानो व चिलीफ्लेक्स टाका आणि कडा दुमडून घ्या.
- एका डिशमध्ये हा ब्रेड ठेवा. असाच दुसरा ब्रेड बनवून घ्या.
- आता तयार डिश ५० मिनिटे बेक करा आणि जरासे थंड झाल्यावर सर्व्ह करा गरमागरम चिज गार्लीक ब्रेड.