या अभ्यासक्रमास इ. १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान इंग्रजी विषयासह उत्तीर्ण किंवा डिप्लोमा फार्मसी उत्तीर्ण/डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) उत्तीर्ण, एमसीव्हीसी उत्तीर्ण असा कोणताही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो.
सध्याच्या आधुनिक काळामध्ये भारतामध्ये विविध प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आलेल्या आहेत. अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी आवश्यक असणारे वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ बीबीए (आय बी) या अभ्यासक्रमाने तयार होणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक संधी उपलब्ध असून भविष्यात उच्च शिक्षणासाठी एमबीए मार्केटिंग, फायनान्स, इंटरनॅशनल बिजनेस, ह्युमन रिसोर्स तसेच इतर तत्सम स्पेशलायझेशनसाठी प्रवेश घेऊ शकतो असे प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी परिसरातील पालकांकडून मागणी होत होती. हा अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.