यावेळी भारतीय टेनिस व्हॉलिबॉल संघाचे उपाध्यक्ष सुरेश रेड्डी, कोषाध्यक्ष धर्मेंद्र सिंह जडेजा, भगवान पेद्दावाड, राज्य संघटनेचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर, तांत्रिक समिती अध्यक्ष प्रफुल्लकुमार बनसोड उपस्थित होते. टेनिस आणि व्हॉलिबॉल या दोन खेळांमधून टेनिस व्हॉलिबॉल या खेळाची निर्मिती झाली. डॉ. वांगवाड यांनी हा खेळ सातासमुद्रापार नेला आहे.
१९८३ मध्ये डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी या खेळाची संकल्पना मांडली. त्यानंतर १९९३ मध्ये विविध शहरांमध्ये या खेळाची प्रात्यक्षिके झाली. जानेवारी २००० मध्ये पुण्यात या खेळाला मान्यता दिली गेली आणि महासंघाची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत २२ राष्ट्रीय स्पर्धा झाल्या असून, जवळपास २० ते २५ राज्ये राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात. तसेच २०१३ ला या खेळास स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता मिळाली, असेही ते म्हणाले.
१५ देशांत खेळाचा प्रचार
आजपर्यंत सहा शालेय राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेचे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील १५ देशांत या खेळाचा प्रसार व प्रचार करण्यात आला आहे, असेही डॉ. वांगवाड यांनी सांगितले.