शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

ग्रामविकास अधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाईची शिफारस

By admin | Published: March 19, 2017 3:48 AM

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात आलेली पोस्ट अन्य गु्रपवर पाठविल्याने बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब एच.

बारामती : सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात आलेली पोस्ट अन्य गु्रपवर पाठविल्याने बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब एच. भोईटे यांना चांगलेच अंगलट आले आहे. या आक्षेपार्ह पोस्टबाबत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. ‘फक्त आणि फक्त कॉमेडी’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेली पोस्ट ग्रामविकास अधिकारी भोईटे यांना अडचणीची ठरली आहे. या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनीदेखील बारामती पंचायत समितीमध्ये येऊन माहिती घेतली होती. याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ, भाजपाचे मुकेश वाघेला, संतोष कांबळे, नानासाहेब भगत, महेश शिंदे आणि पोपटराव खैरे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर भोईटे यांना नोटीस पाठविण्यात आली होती. तक्रारीवर खुलासा मागवण्यात आला. त्यांनी ‘फक्त आणि फक्त कॉमेडी’ या ग्रुपवरून आलेली पोस्ट मुलांकडून दुसऱ्या गु्रपवर पाठवली गेली, असा खुलासा केला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या संदर्भात ही पोस्ट करण्यात आली होती. त्यावर भोईटे यांनी चुकून पोस्ट झाल्याचा मेसेज पाठवला; परंतु या मेसेजमधील वाक्यरचना निंदनीय स्वरूपाची आहे. (प्रतिनिधी)- भ्रमणध्वनीचा वापर करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा अधिनियम १९६७ मधील ३ चा हा भंग आहे. या अधिनियमाच्या कलम ४ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. त्यामुळे सोशल मीडियाच्या कॉमेडी गु्रपच्या पोस्टमुळे ग्रामविकास अधिकारी भोईटे यांना चांगलीच भोवली आहे.