ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारात गुरुवारी ३४ हजार ९९१ कांदा पिशव्यांची विक्रमीआवक होऊन प्रतवारीनुसार नं.१ गोळा कांद्यास प्रतवारीनुसार १० किलोस १७० रुपये ते २०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे व कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.
गुरुवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव खालीलप्रमाणे - कांदा नं. १ (गोळा) १७० रुपये ते २०० रुपये. कांदा नं. २- ( सुपर) -१४० रुपये ते १८० रुपये. कांदा नं.३ -(गोल्टा ) १०० रुपये ते १४० रुपये, कांदा नं. ४ (गोलटी/बदला )३० रुपये ते १०० रुपये, लसूण व बटाटा आवक झाली नाही असे मस्करे यांनी सांगितले.