बाजार भावात घसरण सुरू
ओतूर: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार ओतूर येथे गुरुवारी ३६ हजार ८२ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक होऊन प्रतवारीनुसार नं.१ गोळा कांद्यास १० किलोस १६० रुपये ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. पण बाजारभावात सातत्याने घसरण सुरू आहे अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे व कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली
गुरुवारी प्रतवारीनुसार १०किलोचे भाव खालील प्रमाणे -- कांदा नं. १ गोळा १६० रुपये ते १८० रुपये, सचपर कांदा -१३० ते १७० रुपये , कांदा नं. २- गोल्टा - ९० रुपये ते १३० रुपये, कांदा नं. ३ -गोलटी / बलला -३० रुपये ते ९० रुपये. बटाटा बाजारभाव - गुरुवारी २८ पिशव्या आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस २५ रुपये ते ६० रुपये. लसूण फक्त तीन पिशव्या आवक १० किलोस प्रतवारीनुसार ३०० रुपये ते ५०० रुपये भाव मिळाला अशी माहिती कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.