ओतूर: येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात रविवारी नव्या कांद्याच्या २४ हजार ४०५ पिशव्यांची विक्रमी आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस नं.१ (गोळा) कांद्यास २२० ते २४१ रुपये व सुपर कांद्यास १९० ते २२० रुपये बाजारभाव मिळाला. बाजारभावात १० किलोमागे १९ रुपयांची घसरण झाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव पुढील प्रमाणे: कांदा नं. १ (गोळा) २२० ते २४१ रुपये. सुपर कांदा- १९० ते २२० रुपये.
कांदा नं. २-(कवचट ) १६० ते १९० रुपये.
कांदा नं. ३ -(गोल्टा) १०० ते १६० रुपये. कांदा नं ४- (गोल्टी /बदला) ५० ते १०० रुपये.
बटाटा बाजारभाव - रविवारी ओतूर उपबाजार आवारात ८३६ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किल़ोमागे १० रुपयांची घसरण होऊन १० किलोस ३० रुपये ते १५० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.