जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे रविवारी २० हजार ३६८ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक होऊन नं. १ गोळा कांद्यास प्रतवारीनुसार १० किलोस १२० रुपये ते १४५ बाजारभाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव :
कांदा ---
लाँट--५/ ६ --१२० रुपये ते १६० रूपये .
कांदा नं १--( गोळा ) १२० रुपये ते १४५ रुपये .
कांदा नं१( सुपर कांदा ) -१०० रुपये ते १२० रुपये .
कांदा नं२--( कवचट ) ८० रुपये ते १०० रुपये .
कांदा नं३--( गोल्टा )--६० रुपये ते ८० रुपये .
कांदा नं४--(गोल्टी / बदला ) १० रुपये ते ६० रुपये .
बटाटा बाजार ---
रविवारी फक्त ९७ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारी नुसार १० किलोस ५० रुपये ते १७० रुपये बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती ओतूर उपबाजार समितीचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले. तसेच बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या शेतीमालाचे वाहनावर सॅनिटायझरची फवारणी प्रवेशद्वारातच केली जाते. शिवाय होणाऱ्या शेतीमालाचे लिलाव हे सोशल डिस्टन्स व मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही, अशी माहिती कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.