०८ पिशव्यांची आवक : भावात घसरण सुरूच १० किलोस २४० ते २५० रुपये भाव
ओतूर : ओतूर येथील उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक झाली. जवळापास २४ हजार ४०८ कांदा पिशव्यांची आवक झाली. १० किलोस २४० ते २५० रुपये भाव मिळाला. सुपर कांद्याला २२०ते २४० रुपये भाव मिळाला. बाजारभावात गुरुवारपेक्षा प्रतवारीनुसार १० किलो मागे १२० रुपयांची घसरण झाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव खालील प्रमाणे : कांदा नं. १ (गोळा), २४० ते २५० रुपये, सुपर कांदा २२० ते २४० रुपये.
कांदा नं. २- (कवचट) १८० ते २१० रुपये.
कांदा नं. ३ -(गोल्टा) १३० ते १८० रुपये.
कांदा नं. ४ (गोल्टी बदला) ५० ते १५० रुपये.
बटाटा बाजार : रविवारी उपबाजार आवारात ३४२ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस ३० ते १५० रुपये बाजारभाव मिळाला. बाजारभावात थोडी घसरण झाल्याची माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.