सोमवारी सासवड येथील शासकीय लँबमध्ये ३७९ संशयीतांची तपासणी करण्यात आली पैकी १८६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड १०९, काळेवाडी ९, सोनोरी, सुपे, वाळुंज, शिवरी, माहुर प्रत्येकी ४, देवडी, रोमनवाडी, दिवे प्रत्येकी ३, वनपुरी, पारगाव, चांबळी, वाघापूर, भिवरी, सिंगापुर, नाझरे (क.प) प्रत्येकी २, भिवडी, खानवडी, पवारवाडी, एखतपुर, पीसे, केतकावळे, राजुरी, हिवरे, ढुमेवाडी, आंबळे, कुंभारवळण, खळद, गराडे, पांगारे, पिलाणवाडी प्रत्येकी १, असे ग्रामीण भागात ६९ तर तालुक्या बाहेरचे ८ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लँबमध्ये १९९ संशयीतांची तपासणी करण्यात आली पैकी ६५ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी ११, जवळार्जून ७, पारगाव ५, वाळुंज ३, पिसुर्डी, दवणेमळा, वाल्हे, धालेवाडी, हरणी, मांडकी, भोरवाडी, प्रत्येकी २, सासवड, देवकरवाडी, वीर, पांडेश्वर, मावडी (क.प), राणमळा, मावडी (सुपे), बेलसर, कोळविहीरे, नावळी, साकुर्डे, प्रत्येकी १, असे ग्रामीण भागातील ४०, बारामतीच्या तरडोली ८, जोगवडी २, मुर्टी, १, खंडाळा तालुक्यातील तांबे २ व पुणे शहर १ असे १४ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत.