जवळपास १२० रुग्णसंख्या क्षमता आसलेल्या पटेल रुगणलायत दोन आठवड्यांपूर्वी मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड, आयसीयू विभाग कोरोना रुग्णांनी पूर्णपणे भरलेला होता, परंतु सध्या ही परिस्थिती हळूहळू कमी होत आली असून, काल मेल वॉर्ड १४, फिमेल वॉर्ड ६, आयसीयू ८ अशी रुग्णसंख्या होती तर तीच रुग्णसंख्या आज मेल वॉर्ड १० फिमेल वॉर्ड ३ आणि आयसीयू ५ रुग्ण अशी आहे.
औंध आयटीआय कोरोना सेंटरमध्ये शुकशुकाट
औंध : आयटीआयमधील कोरोना केअर सेंटरमध्ये शुकशुकाट असून, तेथे फक्त ४ रुग्ण असून नवीन रुग्ण येणे बंद आहेत.
मागील महिन्यात सुरुवातीला जवळपास ४० रुग्ण होते, तर दररोज १२ नवीन रुग्ण येत होते. ४/५ रुग्णांना घरी सोडण्यात
येत होते, अशी माहिती डॉ. नीता चिटणीस यांनी दिली. कोटबागी या खासगी कोरोनासाठी राखीव हॉस्पिटलमध्ये सर्व ५५ बेड
वर रुग्ण आज फक्त २ रुग्ण असून, त्यांना ४/५ दिवसांत घरी सोडण्यात येईल, असे या वेळी बोलताना डॉ. प्रसाद कस्तुरे यांनी सांगितले. कोरोना पेशंट कमी होत असल्याने औंध आयटीआयमधील कोरोना केअर सेंटर बंद करण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. कारण ज्या भागातून पेशंट येत आहेत, त्या बोपोडी भागात सेंटर आहे. इतर ठिकाणचे रुग्ण तेथे पाठविण्यात येतील अशी माहिती मिळाली.