साळवाडी येथील शेतकरी सुभाष काळे यांनी आपल्या गट नंबर ५२४ मधील क्षेत्रात एच. एफ.या वाणाचे बटाटा बियाणे ८.५ क्विंटल (१७ गोणी) खरेदी केली. याची लागवड त्यांनी डिसेंबर अखेर केली. लावगडीबरोबर कोंबडीखत व १०.२६ या खताचा वापर केला. बटाट्याला चार ते पाच फवारण्या कृषी सल्लागार प्रवीण गुंजाळ यांच्या सल्ल्यानुसार केल्या.वेळोवेळी विद्राव्य खतांच्या मात्राही दिल्या. वेळोवेळी खतांचे डोस, खुरपणी,पाणी देणे,फवारणी हे सर्व वेळेत केल्यामुळे त्यांना विक्रमी असे उत्पादन मिळण्यास मदत झाली आहे.
सुभाष काळे म्हणाले की, ४० गुंठे क्षेत्रात एकूण भांडवली खर्च ९० हजार एवढा आला असून उत्पादन १५ टन निघाले.शेताच्या बांधावर व्यापाऱ्याला १० रुपये प्रतिकिलो दराने बटाटा विकला. यामधून १ लाख ५० हजार रुपये मिळाले. भांडवली खर्च वजा जाता ६० हजार रुपये नफा शिल्लक राहिला. बाजार भाव कमी असल्याने उत्पादनाच्या होणाऱ्या नफ्यात घट झाली आहे
२७ बेल्हा.